Ad will apear here
Next
पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वांत मोठ्या मेळाव्याची लिम्का बुकमध्ये नोंद
पुणे : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुण्यात झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या स्नेहमेळाव्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. ‘रिज्युव्हिनेट बाय सीनिऑरिटी’ या संकल्पनेवर आधारित या मेळाव्यात तीनशे ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. 

‘सीनिऑरिटी’ या ज्येष्ठांसाठी उत्पादने निर्माण करणाऱ्या कंपनीच्या वतीने, ज्येष्ठ नागरिकांमध्ये आरोग्यपूर्ण सवयींबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कल्याणीनगर येथील जॉगर्स पार्क येथे गुरुवारी (दि.२१) सकाळी सात ते नऊ या वेळेत हा उपक्रम राबवण्यात आला. या वेळी, वडगावशेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार जगदीश तुकाराम मुळीक व अभिनेते मोहन जोशी उपस्थित होते. 

आरपीजी उद्योग समुहाने ज्येष्ठ नागरिकांसाठीची विविध उत्पादने एका छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी  ‘सीनिऑरिटी’ ही कंपनी स्थापन केली असून, त्याचे पुण्यातील दालन कल्याणीनगर भागात सुरू झाले आहे. त्यानिमित्त कंपनीने या उपक्रमाचे आयोजन केले होते. ‘सीनिऑरिटी’चे सहसंस्थापक आयुष अग्रवाल म्हणाले, ‘सीनिऑरिटी या कंपनीची स्थापना भारतातील वृद्ध आणि त्यांची देखभाल करणाऱ्या नागरिकांच्या सोयी व सुविधांसाठी करण्यात आली आहे. वैद्यकीय आणि जीवनशैलीशी निगडीत चार हजारपेक्षा अधिक उत्पादने कंपनीने उपलब्ध केली असून, रिटेल स्टोअरच्या माध्यमातून ग्राहकांना चांगला अनुभव प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे.’ 

ते पुढे म्हणाले, ‘रिज्युव्हिनेट हे केवळ योगासन सत्र नव्हे तर, ज्येष्ठ नागरिकांनी कसे फीट आणि हेल्दी रहावे, हे सांगणारा तो एक अध्याय आहे. आयुष्य खऱ्या अर्थाने कसे एव्हरग्रीन असते, याचे उदाहरण म्हणून या ज्येष्ठांकडे जग पाहू शकेल. ‘सीनिऑरिटी’ या ब्रँडचे आजवर एक लाखांहून अधिक ग्राहक तयार झाले असून, भारतभर विविध कम्युनिटी एन्गेजमेंट उपक्रम राबवण्याचा कंपनीचा मानस आहे.’ 

या वेळी जगदीश मुळीक  म्हणाले, ‘आपल्या समाजातील ज्येष्ठ नागरिकांची आठवण ठेवणाऱ्या व त्यांची काळजी घेत असलेल्या अशा प्रकारचे उपक्रम आनंददायी आहेत. ज्येष्ठ नागरीक हे आपले संरक्षक आणि सल्लागार आहेत. त्यांची प्रगती ही प्रत्येक प्रगतीशील समाजाचे लक्षण आहे. ‘फिट इंडिया’ मोहिमेचे उद्दिष्ट साध्य करण्याकरता अशाप्रकारच्या उपक्रमांचा उपयोग होईल. वृद्धांना निरोगी जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल.’

मोहन जोशी म्हणाले, ‘योगसाधनेचे आपल्या जीवनातले महत्व विषद करणाऱ्या या विशेष दिवशी असा उपक्रम आयोजित केल्याने त्याचे महत्त्व द्विगुणीत झाले आहे. योगासने समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक उत्तम सवय होऊ शकते. मी स्वतः एक ज्येष्ठ नागरिक म्हणून आरोग्यपूर्ण मन, शरीर आणि आत्मा कायम राखण्याची प्रतिज्ञा करतो. ‘ज्येष्ठतेसोबतच पुन्हा तारुण्य’ हा उपक्रम अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून, देशाच्या इतर भागांमधील   ज्येष्ठ नागरिकांना या उपक्रमाच्या कक्षेत आणणे आवश्यक आहे.’

‘सीनिऑरिटी’चे सहसंस्थापक तपन मिश्रा म्हणाले, ‘सीनिऑरिटी या संस्थेने कल्याणीनगर येथील आमच्या स्टोअरमध्ये निरोगी जीवन आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठीच्या विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच, या कार्यक्रमांचा विस्तारही केला आहे. ‘रिज्युव्हिनेट बाय सीनिऑरिटी’ हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम असून, भारतभरात अशा प्रकारचे उपक्रम यापुढेही आयोजित करणार आहोत.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZNZBP
Similar Posts
रंगसंमेलनात रसिकांसाठी भरगच्च कार्यक्रम पुणे : चतुरंग प्रतिष्ठानतर्फे येथे प्रथमच होणाऱ्या रंगसंमेलनात ‘चतुरंग’ने पुणेकर रसिकांसाठी भरगच्च कार्यक्रम आखले आहेत. सॅक्सोफोन आणि बासरीच्या ‘नाद नभांगणी नाचतो’ या वादनजुगलबंदीने रंगसंमेलनाला सुरुवात होणार आहे. विद्वान पं. कद्री गोपालनाथ आणि पं. रोणू मजुमदार यांच्या या ‘वादनारंगा’ला पं. अरविंद आझाद (तबला) आणि बी
‘इंडिया फॅशन वॉक रनवे सनसेट्स’चे चौथे पर्व पुण्यात पुणे : कल्याणीनगर येथील अॅलेस ब्र्युज अॅन्डे सायडर्स येथे इंडिया फॅशन वॉक रनवे सनसेट्सच्या चौथ्याी पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. डब्ल्यूटीएफ इंडियाद्वारे ऑक्टोबर २०१६मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाचा एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरांतील डिझायनर्सना तसेच प्रतिथयश डिझायनर्स
‘पुष्पक विमान’ येत्या तीन ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला पुणे : आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त. आजोबा आणि नातवाच्या दोस्तीची गोष्ट सांगणारा ‘पुष्पक विमान’ हा ‘झी स्टुडिओज्’ची प्रस्तुती आणि सुबोध भावे लिखित चित्रपट येत्या तीन ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वैभव चिंचाळकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून, यात सुबोध भावे आणि मोहन जोशी हे कलाकार रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत
आझम कॅम्पसमध्ये २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटी येथे शुक्रवार, २१ जून २०१९ रोजी सकाळी सात वाजता आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ‘एमसीई’ सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी दिली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language